Thursday, May 7, 2026
police dakshta logo
Homeभुसावळसाकरी ग्रामपंचायतीची पंचायतराज अभियान समितीकडून पाहणी

साकरी ग्रामपंचायतीची पंचायतराज अभियान समितीकडून पाहणी

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील साकरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समिती समुद्रपूर, जिल्हा वर्धा येथील तपासणी पथकाने ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची पाहणी केली. दि. ५ मे रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही तपासणी करण्यात आली.या समितीत सतीश टिचुकले (गटविकास अधिकारी, समुद्रपूर), अशोक गिद्देवार (गटशिक्षणाधिकारी), एम. एस. डेहणकर (कृषी अधिकारी), गणेश माने (विस्तार अधिकारी, पंचायत समिती) तसेच आर. के. जाधव (विस्तार अधिकारी, आरोग्य) यांचा समावेश होता.तपासणी पथकाने साकरी ग्रामपंचायतीची २० टक्के तपासणी केली.अभियान कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या वृक्षलागवड, सीसीटीव्ही कॅमेरे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वाचनालय, व्यायामशाळा, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, स्मशानभूमी आदी विकासकामांची समितीने प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आयुष्मान भारत कार्ड, शोषखड्डे, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांचीही तपासणी करण्यात आली. या सर्व कामांबाबत समितीने समाधान व्यक्त केले.

यावेळी गौतम वाढे (विस्तार अधिकारी, पंचायत समिती भुसावळ), सुनील महाजन (माजी सभापती, पंचायत समिती भुसावळ), प्रशासक विनोद सोनवणे, उपप्रशासक रोशन पाटील, जितेंद्र चोपडे, किरण चोपडे तसेच ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाटील उपस्थित होते.तपासणी पथकाने गावातील विविध ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. साकरी गावातील उपलब्ध सुखसुविधा व विकासकामे पाहून पथकाने समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या