Friday, May 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याआज ८ मे रोजी एसएससीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार

आज ८ मे रोजी एसएससीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार

भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचा निकाल गुरुवार, दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत इयत्ता १० वीची परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहता येणार असून, निकाल जाहीर होताच राज्यभरातील लाखो विद्यार्थी व पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना आपला बैठक क्रमांक व आवश्यक माहिती जवळ ठेवावी, असे आवाहनही मंडळाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या