Wednesday, May 13, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याअल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याने खळबळ; मुक्ताईनगरमध्ये पाच जणांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याने खळबळ; मुक्ताईनगरमध्ये पाच जणांवर गुन्हा

मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील वडगाव येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हा झिरो नंबरने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ मे रोजी वडगाव येथील महादेव मंदिरात अवघ्या १६ वर्षे ११ महिने वय असलेल्या मुलीचा विवाह पार पडला. मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण माहिती असतानाही संबंधितांनी विवाह लावून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या विवाहासाठी काही मध्यस्थांनी पुढाकार घेतल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.दरम्यान, मुलीचे भविष्य धोक्यात जात असल्याची जाणीव झाल्यानंतर तिची आजी सुरपाबाई बाबुराव जामुनकर (रा. उमापूर, जि. बुलढाणा) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविला.

या प्रकरणात रामचंद्र बाबुराव जामुनकर, बबिता रामचंद्र जामुनकर, झुंमकलाल हिरा धांडेकर, गजानन रमेश मांजरे (रा. धानोरा) तसेच तुकाराम उर्फ मयुर पाटील (रा. महालखेडा) यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कलम ९, १० व ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या