Monday, May 18, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्या१ जूनपासून एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृह सेवा मोफत; प्रवाशांना मोठा दिलासा

१ जूनपासून एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृह सेवा मोफत; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृह सेवा येत्या १ जूनपासून प्रवाशांसाठी पूर्णतः मोफत करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.प्रवाशांच्या आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा विचार करून महाराष्ट्र शासन आणि एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला असून त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयानुसार राज्यातील सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांची जबाबदारी खासगी कंत्राटदारांमार्फत स्थानिक स्तरावर राबविण्यात येणार आहे. मात्र स्वच्छतागृहांची देखभाल, नियमित साफसफाई आणि स्वच्छतेची गुणवत्ता राखण्याची अंतिम जबाबदारी एसटी महामंडळाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि सुविधा अधिक दर्जेदार करण्यावर भर देण्यात येणार असून प्रवाशांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नियमित तपासणी यंत्रणाही कार्यान्वित केली जाणार आहे. बसस्थानक परिसरातील स्वच्छतेसोबतच पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रमुख स्थानकांवर पाणपोया सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून महिलां, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी याचा मोठा लाभ होणार आहे.

प्रवाशांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून एसटी प्रशासनाने सर्व बसस्थानक व्यवस्थापकांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या