Monday, May 18, 2026
police dakshta logo
Homeक्राईममुक्ताईनगरात पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ शेतकऱ्याची 60 हजारांची फसवणूक

मुक्ताईनगरात पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ शेतकऱ्याची 60 हजारांची फसवणूक

मुक्ताईनगर |  प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगर तालुक्यात पोलीस असल्याची खोटी बतावणी करून दोन अज्ञात इसमांनी एका ज्येष्ठ शेतकऱ्याची तब्बल 60 हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश रघुनाथ बोठे (वय 69, रा. वढवे, ता. मुक्ताईनगर) हे दि. 17 मे 2026 रोजी बाजार करून मोटारसायकलने घरी परतत होते. दरम्यान, सालबर्डी गावाजवळ योगायोग हॉटेल परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. संबंधितांनी आपण पोलीस असल्याचे सांगत त्यांची चौकशी सुरू केली.दरम्यान, संशय निर्माण करून आरोपींनी फिर्यादी यांच्या हातातील एक 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व दुसरी 4 ग्रॅम वजनाची पुष्पराज खडा असलेली सोन्याची अंगठी अशा एकूण 60 हजार रुपये किमतीच्या वस्तू घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0214/2026 अंतर्गत BNS कलम 204 व 318(4) प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ. राजेश चव्हाण करीत आहेत.

नागरिकांनी अशा प्रकारच्या तोतया पोलीसांकडून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहून संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या