Wednesday, May 27, 2026
police dakshta logo
Homeजळगावडिझेल टंचाईवर शेतकऱ्यांचा सवाल; मोठ्या वाहनांना पुरवठा, मात्र ट्रॅक्टरसाठी मर्यादा

डिझेल टंचाईवर शेतकऱ्यांचा सवाल; मोठ्या वाहनांना पुरवठा, मात्र ट्रॅक्टरसाठी मर्यादा

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यात सध्या डिझेल टंचाईची समस्या गंभीर बनत असून, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी केवळ मर्यादित प्रमाणात डिझेल मिळत असल्याची तक्रार पुढे येत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरधारकांना ५० लिटरपर्यंतच डिझेल देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.दरम्यान, तालुक्यात रस्त्यांच्या कामासाठी फिरणारे काही डंपर तसेच अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. तसेच रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पोकलँड आणि जेसीबी यांसारख्या यंत्रणा डिझेलअभावी बंद असल्याच्या कोणत्याही बातम्या समोर आलेल्या नाहीत, याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात वेळेवर डिझेल उपलब्ध व्हावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. “मोठ्या वाहनांना डिझेल उपलब्ध होते, मग शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरला मर्यादा का?” असा सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या