Thursday, May 28, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासाकेगाव-निंभोरा येथे पोलिसांचा रूट मार्च; बकरी ईदपूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक

साकेगाव-निंभोरा येथे पोलिसांचा रूट मार्च; बकरी ईदपूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक

भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह:- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनतर्फे साकेगाव व निंभोरा बु. येथे बुधवारी (दि. 27 मे 2026) सायंकाळी रूट मार्च व दंगा काबू योजना राबविण्यात आली.सदर रूट मार्च सायंकाळी 5.30 ते 7.30 वाजेदरम्यान घेण्यात आला. साकेगाव येथे मरिमाता चौक, भवानीनगर, पोळा मैदान, पटेल गल्ली ते मरिमाता चौक या मार्गावर पोलिसांनी संचलन केले. तसेच निंभोरा बु. येथे गैबन शाह वाली बाबा दर्गा, ग्रामपंचायत, शिवाजीनगर, सर कॉलनी ते चेतन हॉटेल या परिसरात रूट मार्च काढण्यात आला.

या वेळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे एक अधिकारी, 15 पोलीस अंमलदार तसेच 25 होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते. नागरिकांनी शांतता व सौहार्द कायम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या