Monday, June 1, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणवाकी नदीत मृत बिबट्याचे पिल्लू आढळल्याने खळबळ; वन विभागाची तातडीने कारवाई!

वाकी नदीत मृत बिबट्याचे पिल्लू आढळल्याने खळबळ; वन विभागाची तातडीने कारवाई!

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद परिसरातील वाकी नदीत एका बिबटाच्या पिल्लाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.उपवनसंरक्षक, जळगाव विभाग, जळगाव राम धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अमोल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे तसेच पशुधन विकास विभागाचे अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कार्यवाही केली.

मृत बिबट पिल्लू आढळलेल्या ठिकाणाचा सविस्तर पंचनामा करण्यात आला असून संबंधित नियमांनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. तसेच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील वैद्यकीय व तांत्रिक तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही घटना गंभीर मानली जात असून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील नागरिकांनी वन्यजीव आढळल्यास अथवा संशयास्पद बाबी निदर्शनास आल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या