Saturday, June 6, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यासावद्यात अवकाळी तडाखा; तुफान वादळासह गारपीट, रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक विस्कळीत

सावद्यात अवकाळी तडाखा; तुफान वादळासह गारपीट, रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक विस्कळीत

रावेर-सावदा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रावेर तालुक्यातील सावदा शहरासह परिसरात शनिवारी दुपारी अचानक हवामानात बदल होऊन तुफान वादळासह गारपीट झाली. सुमारे दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.दरम्यान, सावदा–फैजपूर मार्गावरील साईबाबा मंदिराजवळ एक भलेमोठे निंबाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाड हटविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

सावदा परिसरात जवळपास पाऊण तास गारांसह मुसळधार पाऊस कोसळत होता. वादळी वाऱ्याचा वेगही मोठा असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गातही चिंता व्यक्त केली जात असून पिकांच्या नुकसानीची शक्यता वर्तविली जात आहे.परिसरात पावसाची संततधार सुरूच होती. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक तेवढेच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले असून, वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या