Sunday, June 7, 2026
police dakshta logo
Homeक्राईमसुदर्शन पेपर मील कामगाराचा वाळूच्या डंपर खाली आल्याने मृत्यू !

सुदर्शन पेपर मील कामगाराचा वाळूच्या डंपर खाली आल्याने मृत्यू !

भुसावळ तालुका पोलीसांची माहिती 
भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ – सुनसगाव – गोजोरे रस्त्यावर गट नंबर ३०८ / १ येथील सुदर्शन पेपर मील येथे दि.४ जून च्या रात्री घराबाहेर झोपलेल्या कामगाराचा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र भुसावळ तालुका पोलीसांना हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आणि अखेर डंपर च्या मागील चाकाखाली आल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची फिर्याद स्वतः तपास करणारे पोहेकाॅ धिरज मंडलिक यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे.

या बाबत तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की , दि. ४ जून रोजी रात्री अंदाजे २:५० वाजता मयत राजा भैय्या नत्थू वय ३८ या.धरदुवा जि.बांधा उत्तर प्रदेश सध्या मुक्काम सुदर्शन पेपर मील सुनसगाव ता भुसावळ घरा बाहेर अंगणात झोपलेला असताना याच ठिकाणी आरोपी वाळूने भरलेला डंपर क्रमांक एम एच १९ झेड ८३८८ चालकाने ( नाव गाव पत्ता माहिती नाही ) डंपर मागे ( रिव्हर्स ) घेऊन सदर ठिकाणी झोपलेल्या राजा भैय्या नत्थू यांच्या डाव्या खांद्याच्या वरुन व मानेवरून वाळूने भरलेल्या डंपरचे टायर चढवून अपघात घडवून आणला.या गंभीर दुखापती मुळे राजा भैय्या नत्थू याचा मृत्यू ओढवला तसेच सदर ठिकाणी अपघात घडल्याची माहिती असतानाही या अपघाताची माहिती कोणालाही न सांगता आणि जखमीला दवाखान्यात न नेता आरोपी घटना स्थळावरुन वाहन घेऊन पळून गेला. या घटने बाबत सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र आता भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये सी.सी. टी.एन.एस. गु.र.नं.०११६ / २०२६ भारतीय न्याय संहिता ( बीएनएस ) कायदा कलम १०५ , २८१ सह मोटार वाहन कायदा कलम १३४ ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड हे करीत आहेत.

कुऱ्हा पानाचे औट पोष्टचे पोलीस कर्मचारी यांनी दोन तीन दिवसात योग्य दिशेने घटनेचा तपास केला तसेच घटनेचा तपास करणारे पोहेकाॅ धिरज मंडलिक यांनी दोन तीन दिवसात घटनास्थळी वारंवार जाऊन तसेच वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे यांचे मार्गदर्शन व कुऱ्हा पानाचे औट पोष्टचे पोलीस कर्मचारी आणि फाॅरेन्सिक लॅब टीम यांच्या व वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योग्य दिशेने तपास करुन स्वतः फिर्याद दाखल केली यामुळे पोहेकाॅ धिरज मंडलिक यांचे कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या