Saturday, June 27, 2026
police dakshta logo
HomeUncategorizedसंस्कृती माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

संस्कृती माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मेहरून परिसरातील संस्कृती माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण व श्रद्धामय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस अभिवादन करून आदरांजली वाहिली.यावेळी राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समता आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संदेश देण्यात आला.

 

कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम श्रद्धा व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.राजर्षी शाहू महाराज यांना यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या