Thursday, July 2, 2026
police dakshta logo
Homeजळगावडायल 112 आपत्कालीन सेवेत जळगाव पोलीस नाशिक परिक्षेत्रात अव्वल

डायल 112 आपत्कालीन सेवेत जळगाव पोलीस नाशिक परिक्षेत्रात अव्वल

अवघ्या 7 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत जळगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- डायल 112 आपत्कालीन सेवा अंतर्गत जून 2026 महिन्यातील कामगिरीत जळगाव पोलिसांनी नाशिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सर्वात जलद ‘फायनल रिस्पॉन्स टाइम’ नोंदवत जळगाव पोलिसांनी सरासरी अवघ्या 7 मिनिटांत घटनास्थळी पोहोचून प्रभावी व तत्पर सेवा दिल्याचे समोर आले आहे.जून 2026 दरम्यान जळगाव पोलिसांना डायल 112 आपत्कालीन सेवेद्वारे एकूण 2 हजार 848 कॉल प्राप्त झाले होते. प्राप्त सर्व कॉल्सवर तातडीने प्रतिसाद देत पोलिसांनी प्रभावीपणे कार्यवाही केली. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे चित्र आहे.

नाशिक परिक्षेत्रातील जिल्हानिहाय फायनल रिस्पॉन्स टाइम पुढीलप्रमाणे नोंदविण्यात आला आहे :
जळगाव – 7 मिनिटे (प्रथम)
नंदुरबार – 8 मिनिटे 33 सेकंद
धुळे – 8 मिनिटे 39 सेकंद
नाशिक ग्रामीण – 10 मिनिटे 09 सेकंद
अहिल्यानगर – 14 मिनिटे 19 सेकंद
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलीस दल सातत्याने प्रभावी व उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही काळात पोलिसांकडून सुरू असलेल्या विविध कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण होत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

त्वरित प्रतिसाद, सक्षम कायदा व सुव्यवस्था आणि अधिक प्रभावी आपत्कालीन यंत्रणा यामुळे जळगाव पोलिसांचे कामकाज संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात सर्वोत्कृष्ट ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या