Thursday, July 2, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याटाकरखेड्यात कामादरम्यान भीषण दुर्घटना; ग्राइंडरचा घाव लागून वृद्ध सुताराचा मृत्यू

टाकरखेड्यात कामादरम्यान भीषण दुर्घटना; ग्राइंडरचा घाव लागून वृद्ध सुताराचा मृत्यू

अमळनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील टाकरखेडा येथे लाकडी काम करत असताना घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका ज्येष्ठ कारागिराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.मृत व्यक्तीचे नाव देविदास लटकन सुतार (वय ७४) असे असून ते व्यवसायाने सुतारकाम करीत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना त्यांच्या हातातील ग्राइंडर मशीन अचानक अनियंत्रित झाले. मशीनचा धारदार भाग थेट गळ्याजवळ लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत त्यांना उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.या दुर्घटनेमुळे टाकरखेडा गावात हळहळ व्यक्त होत असून, देविदास सुतार यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या