मन्यारखेडा येथील फातिमा नगरातील ३६ खोल्या परिसरात पोलिसांची कारवाई; २५ किलो मांस जप्त, गुन्हा दाखल
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दि. २४ वार शुक्रवार रोजी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मन्यारखेडा परिसरातील फातिमा नगर येथील ३६ खोल्या परिसरात अवैधरित्या गोवंश सदृश्य मांसाची कत्तल करून विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी कारवाई करत एका संशयितास अटक केली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे २५ किलो गोवंश सदृश्य मांस जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजेच्या सुमारास फातिमा नगरातील ३६ खोल्या परिसरात बंद टपरीच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या गोवंश सदृश्य मांसाची कत्तल करून विक्रीसाठी साठवणूक करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अंदाजे २५ किलो गोवंश सदृश्य मांस, किंमत सुमारे ५ हजार रुपये, जप्त केले.या प्रकरणी मुक्तार जमाल कुरेशी (वय ४०) व परवीन मुक्तार कुरेशी (दोघे रा. ३६ खोल्या, फातिमा नगर, जळगाव) यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कारवाई केली. या कारवाईत पुरुष आरोपी मुक्तार जमाल कुरेशी यास अटक करण्यात आली असून पुढील तपास नशिराबाद पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल सागर बिडे, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे व प्रवीण लोहार यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.