Saturday, July 25, 2026
police dakshta logo
Homeजळगावसंस्कृती माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात

संस्कृती माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संस्कृती माध्यमिक विद्यालयात पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.दिंडी सोहळ्याचा शुभारंभ जयदुर्गा महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ. जयश्रीताई सुनील महाजन यांच्या हस्ते झाला. प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.यानंतर श्री विठ्ठलाच्या पालखीची शालेय परिसरातून भक्तिमय मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत दिंडीत सहभाग घेतला. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला

कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, भक्तीभाव, संस्कार आणि सांस्कृतिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थितांनी दिंडी सोहळ्याचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या