शिबिर नशिराबाद येथे श्री.इच्छापूर्ती हॉल, कल्पना गणेश मंडळ, जैन मंदिराजवळ, सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत होणार आहे.
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी नशिराबाद येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव, डॉ. ए. जी. भांगळे यांचे समर्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गट), नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर श्री इच्छापूर्ती हॉल, कल्पना गणेश मंडळ, जैन मंदिराजवळ, नशिराबाद येथे सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत होणार आहे. शिबिराचे आयोजन मा. श्री. गणेश नथ्थू चव्हाण (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नशिराबाद) यांनी केले आहे.शिबिरामध्ये तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन व प्राथमिक तपासणी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईसीजी (ECG) व बीपी मॉनिटर तपासणी, मुख कर्करोग तपासणी व उपचाराविषयी मार्गदर्शन, स्तन कर्करोग तपासणी व उपचारासाठी उपलब्ध सुविधांची माहिती तसेच महिला आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आजाराचे निदान झाल्यास आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या शिबिरासाठी अधिक माहितीसाठी जयेश पाटील (मो. ९१९५१८६०९१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.