Saturday, July 25, 2026
police dakshta logo
Homeनशिराबादआषाढी एकादशीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९०–९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा वृक्षारोपण उपक्रम

आषाढी एकादशीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९०–९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा वृक्षारोपण उपक्रम

नगरपरिषद आवारात निंब, पिंपळ, चिंच आदी वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

नशिराबाद | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :– दि. २५ जुलै : आषाढी एकादशीचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथील सन १९९०–९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत नगरपरिषद नशिराबादच्या आवारात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविला. सालाबादप्रमाणे यंदाही माजी विद्यार्थी एकत्र येत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी निंब, पिंपळ, चिंच आदी पर्यावरणपूरक व दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारत पर्यावरण रक्षणाचा संकल्प व्यक्त केला.

या उपक्रमात विनोद रंधे, नागराज महाजन, सुनील पांढरकर, अनिल झटके, शेखर चौधरी, नितीन तारकस, चंद्रकांत फेगडे, विकास येवले, अविनाश किनगे आणि विवेक बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.वृक्षारोपणासारख्या सामाजिक उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देत माजी विद्यार्थ्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला. भविष्यातही विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच, “राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी, विठ्ठल हरी” या भक्तिमय जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या