Sunday, July 26, 2026
police dakshta logo
Homeनशिराबादजनसेवा सप्ताहांतर्गत नशिराबाद उर्दू कन्या शाळेत विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा...

जनसेवा सप्ताहांतर्गत नशिराबाद उर्दू कन्या शाळेत विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नशिराबाद | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसेवा सप्ताहांतर्गत नशिराबाद येथील उर्दू कन्या शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप तसेच वृक्षारोपणाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रदेश प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे यांच्या वतीने गरजू विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये निसर्गप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने उपस्थित मान्यवरांनी वृक्ष लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प व्यक्त केला.

प्रास्ताविकात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद बरकत अली यांनी जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा पक्षाचा संकल्प व्यक्त केला.या उपक्रमासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर (आप्पासाहेब) तसेच प्रदेश प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे यांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष योगेश पाटील, सभापती तथा नगरसेवक किर्तीकांत चोबे, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, ज्येष्ठ नेते नामदेव चौधरी, लीलाधर तायडे, शहराध्यक्ष गणेश चव्हाण, सचिन धांडे, नगरसेवक मनियार शेख आसिफ, नगरसेवक शेख मुश्ताक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नईम सर यांनी केले, तर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी उपस्थित मान्यवरांचे व सहभागींचे आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या