Monday, July 27, 2026
police dakshta logo
Homeजळगावप्रति पंढरपूर पिंप्राळा व देवेंद्रनगरात 'भक्तीनाद' भजनसंध्येने रंगली विठ्ठलभक्तीची मैफील

प्रति पंढरपूर पिंप्राळा व देवेंद्रनगरात ‘भक्तीनाद’ भजनसंध्येने रंगली विठ्ठलभक्तीची मैफील

आषाढी एकादशीनिमित्त सुरांची भावपूर्ण स्वरांजली; पिंप्राळा व देवेंद्रनगरातील कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव |  प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त जळगाव शहरातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंप्राळा येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिर तसेच महाबळ कॉलनी परिसरातील देवेंद्रनगर (नूतन वर्षा कॉलनी) येथील श्री विठ्ठल मंदिरात ‘भक्तीनाद’ भजनसंध्येचा भक्तिमय सोहळा उत्साहात पार पडला. प्रसिद्ध कलावंत, आयोजक व निवेदक तुषार वाघुळदे प्रस्तुत ‘भक्तीनाद’ ग्रुपच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी सुरांची भावपूर्ण स्वरांजली अर्पण करण्यात आली.पिंप्राळा येथील सकाळच्या कार्यक्रमात टाळ-चिपळ्यांच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. सुमधुर भजनांच्या सादरीकरणामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. विठ्ठल नामस्मरणात तल्लीन झालेल्या भाविकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या मैफिलीत मुख्य गायक निलेश पाटील, गायिका वृंदा पालखे, प्रवीण (आबा) पाटील, कल्याणी वाणी, गुलाब कापडणे आणि सोमनाथ शिंपी यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली.सायंकाळी महाबळ कॉलनी परिसरातील नूतन वर्षा कॉलनी येथील श्री विठ्ठल मंदिरात भक्तीगीतांची दुसरी मैफल रंगली. कार्यक्रमाचा प्रारंभ अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची आरती करून झाला. यावेळी ‘भक्तीनाद’ ग्रुपचे संचालक तुषार वाघुळदे, मुख्य गायक निलेश पाटील, गायिका वृंदा पालखे, प्रवीण पाटील आणि संयुक्ता बयाणी यांनी विविध भक्तीगीतांचे सादरीकरण करून भाविकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या