Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगाव उप जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या....!!

जळगाव उप जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या….!!

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव / कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे / पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्याचे उप जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी व भूसंपादन अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या बदल्या झाल्या आहेत.राज्याचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी हे आदेश काढले. आहेत.याबाबतचे शासकीय आदेश देखील निर्गमीत करण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या महसूल व वन खात्याने उपजिल्हाधिकारी संवर्गातील १४ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.यात
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्याचे निवासी उप जिल्हाधिकारी राहूल पाटील यांची निवडणूक उप जिल्हाधिकारी या पदावर अहमदनगर येथे झालेली आहे. यासोबतच जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांची देखील बदली झाली आहे त्यांना अद्याप पावेतो नियुक्ती मिळालेली नाही तर, त्यांच्या जागी धुळे येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड हे बदली होऊन लवकरच रुजू होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी पोलीस दक्षता लाईव्हच्या प्रतिनिधीला सांगितले. तसेच जिल्हा भू-संपादन अधिकारी किरण सावंत यांची उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी अहमदनगर येथील पुरवठा अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती जयश्री माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे शासकीय आदेश हे निर्गमीत करण्यात आलेले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी संपादन अधिकारी हे येत्या काही दिवसातच पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या कोणत्या कारणास्तव करण्यात आल्या हे मात्र समजू शकले नाही.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या