Thursday, August 27, 2026
police dakshta logo
Homeजळगावसाळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात

साळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- साळी समाजाचे आद्यदैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी ६ वाजता भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रामदास डहाके यांनी पोथीवाचन केले, तर साळी माता महिला मंडळाच्या वतीने स्वागतगीत सादर करण्यात आले.

भगवान श्री जिव्हेश्वर युवक मंडळाने तरसोद येथे नव्याने घेतलेल्या जागेवर यानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. तसेच फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, लॅण्ड डेव्हलपर यशवंत बारी, एरंडोल साळी महासभेचे अध्यक्ष सोमनाथ कासटकर, महावितरण जळगाव शहर व ग्रामीणचे अभियंता दत्तात्रय साळी, जिव्हेश्वर युवक मंडळाचे अध्यक्ष राजू खेडकर, उपाध्यक्ष सुधीर खंडारे, सचिव किशोर खंडारे, सहसचिव पद्माकर आखडकर, कोषाध्यक्ष गणेश भोगरे यांच्यासह सुभाष धमके, संजय चिंचकर, प्रदीप साळी तसेच समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गुणवंत विद्यार्थी, पदोन्नती प्राप्त समाजबांधव तसेच समाजाच्या कार्यासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपली खंडारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहा खंडारे, दिनेश साळी, दत्तात्रय भोगरे, मनीष वाझट, प्रशांत खंडारे, प्रमोद भोगरे आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या