Friday, August 28, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणरक्षाबंधनाच्या पर्वावर न्यू इंग्लिश स्कूलच्या १३ विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ ईस्टकडून सायकलींची...

रक्षाबंधनाच्या पर्वावर न्यू इंग्लिश स्कूलच्या १३ विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ ईस्टकडून सायकलींची अनोखी भेट

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रक्षाबंधनाच्या पर्वाचे औचित्य साधून नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील १३ गरजू विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ ईस्ट, जळगावच्या वतीने सायकलींचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींचा शैक्षणिक प्रवास सुलभ व्हावा तसेच शाळेत ये-जा करण्यासाठी लागणारा वेळ वाचावा, या उद्देशाने रोटरी क्लबच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत यापूर्वीदेखील शाळेतील गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. यंदा गरीब व गरजू तसेच आई-वडील अथवा पालकांचे छत्र नसलेल्या विद्यार्थिनींची निवड करून त्यांना सायकली भेट देण्यात आल्या. रक्षाबंधनाच्या पर्वावर मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे विद्यार्थिनी भारावून गेल्या.
यावेळी रोटरी क्लबचे सदस्य कल्पेश छेडा यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थिनींना ही भेट देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच रोटरी क्लबचे सदस्य संजय गांधी यांनी विद्यार्थिनींनी सायकलींचा उपयोग केवळ शैक्षणिक कामासाठी करावा. भविष्यात सायकलची गरज उरली नाही, तर ती विक्री न करता दुसऱ्या गरजू विद्यार्थिनीला देण्यात यावी, असे आवाहन केले.

या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप
प्रतीक्षा भोई, पायल राठोड, जानवी नाथ, चेतना माळी, ज्ञानेश्वरी कुंभार, यशस्वी पाटील, तेजल सोळंके, कोमल सोनवणे, तृप्ती गोसावी, दिपाली बारीला, भुवनेश्वर मानकरी, प्रज्ञा पगारे आणि समृद्धी इंगळे या विद्यार्थिनींना सायकली भेट देण्यात आल्या.

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉ. मनोज चौधरी, सेक्रेटरी पूजा अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन प्रीतम मुनोत, धीरज काबरा, नितेश जैन, कल्पेश छेडा, कौशल लोढा यांच्यासह नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सचिव मधुकर चौबे, संचालक विनायक वाणी, राजेश पाटील, जनार्दन माळी, ॲड. प्रदीप देशपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे, उपमुख्याध्यापक ए. डी. चौधरी, पर्यवेक्षक एस. एन. पाचपांडे तसेच सायकली मिळालेल्या विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पाचपांडे सर यांनी केले, तर आभार जी. टी. पाटील यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या