Friday, August 28, 2026
police dakshta logo
Homeजळगावविद्यार्थ्यांच्या एकजुटीतून साकारली भव्य मानवी राखी

विद्यार्थ्यांच्या एकजुटीतून साकारली भव्य मानवी राखी

शेठ ला. ना. सा. विद्यालयात रक्षाबंधनानिमित्त अभिनव उपक्रम; बंधुभाव, एकता व राष्ट्रप्रेमाचा संदेश

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भारतीय संस्कृतीत भाऊ-बहिणीच्या स्नेह, विश्वास आणि रक्षणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संरचनेतून भव्य व आकर्षक मानवी राखी साकारण्यात आली.या मानवी राखीच्या सजावटीमध्ये तिरंगा ध्वज तसेच स्वस्तिक चिन्हाचा वापर करण्यात आल्याने संपूर्ण विद्यार्थी संरचना अत्यंत देखणी व लक्षवेधी ठरली. विद्यार्थिनींना मध्यभागी बसवून स्वस्तिक चिन्हाची रचना करण्यात आली होती. राखीच्या रचनेनुसार मैदानावर बसताना विद्यार्थ्यांनी शिस्त, संयम, समन्वय व एकजुटीचे उत्कृष्ट दर्शन घडविले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पकतेला आणि नेतृत्वगुणांना वाव मिळावा, तसेच सामूहिक कार्यातून एकात्मता, बंधुभाव व सहकार्याची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे व उपमुख्याध्यापक संजय वानखेडे यांच्या संकल्पनेनुसार पर्यवेक्षक रमा तारे व जगदीश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक उल्हास ठाकरे, हिम्मत काळे, उमेश ढाकणे, आनंद पाटील, प्रणित येवले, जावेद पटेल, अशोक पाटील, मयूर पाटील, दिलीप गायकवाड, हितेंद्र जोशी, तसेच मंगला भारुळे, संपदा तुंबळे, वृषाली पाटील, मनिषा देशमुख, स्वाती एडके, किशोर माळी व अरुणा अडकमोल यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध मार्गदर्शन व सहकार्य केले.विद्यार्थ्यांच्या एकजुटीतून साकारलेल्या या आकर्षक मानवी राखीच्या माध्यमातून एकता, बंधुभाव, सहकार्य आणि राष्ट्रप्रेमाचा प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यालयाचा हा अभिनव उपक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या