Monday, September 7, 2026
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबादचे सहा सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार..

नशिराबादचे सहा सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार..

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा आदेश; वर्षभरासाठी जळगाव जिल्ह्याच्या महसुली हद्दीत प्रवेशबंदी

जळगाव : नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सहा सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलीस प्रशासनाने मोठी प्रतिबंधक कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये माननीय उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव विभाग यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधित सहा जणांना एक वर्षाच्या कालावधीसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.हद्दपार करण्यात आलेल्या इसमांमध्ये अताउल्ला उर्फ मायाबाई अमानुल्ला शहा, मुकतार शहा खलील शहा, अक्रम शहा सादिक शहा, रोहित दिलीप नाथ, विपुल गोविंदा नाथ आणि आवेश उर्फ काल्या शेख जहांगीर यांचा समावेश आहे. हे सर्वजण नशिराबाद, ता. जि. जळगाव येथील रहिवासी आहेत.सदर इसमांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यांच्या कथित गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने नशिराबाद पोलीस ठाण्याकडून हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी संबंधितांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.दरम्यान, हद्दपारीच्या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करून संबंधितांनी सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता जळगाव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यास त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गुणवंत देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर आणि पोलीस कॉन्स्टेबल पंकज सोनवणे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या