Thursday, September 24, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणसुनसगावच्या के.टी.वेअरमधील पाणी अडविण्यासाठी नशिराबाद नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे श्रमदान!

सुनसगावच्या के.टी.वेअरमधील पाणी अडविण्यासाठी नशिराबाद नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे श्रमदान!

अनेक वर्षांपासून बंधाऱ्याला भगदाड..

नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते लालचंद पाटील यांच्या मार्गदर्शनाने दगड व वाळूच्या पोत्यांच्या साहाय्याने पाणी अडविण्याचा प्रयत्न..

भुसावळ | प्रतिनिधी जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील वाघूर नदीवर बांधण्यात आलेल्या के. टी. वेअरला अनेक वर्षांपासून भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. याबाबत नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते लालचंद पाटील यांनी वारंवार संबंधितांचे लक्ष वेधूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर लालचंद पाटील यांच्या प्रयत्नांतून नशिराबाद नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत बंधाऱ्यातील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न केले.नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी बंधाऱ्याला पडलेले भगदाड बुजविण्यासाठी दगड तसेच पोत्यांमध्ये वाळू भरून पाणी अडविण्याचे काम केले. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न अद्याप कायम आहे. संबंधित शासकीय यंत्रणा व स्थानिक पातळीवर आवश्यक उपाययोजना होणे गरजेचे असताना नशिराबाद नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे. दरम्यान, बंधाऱ्यातून होणारी पाण्याची गळती कायमस्वरूपी थांबविण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या