जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांनी स्वहस्ते आकर्षक शुभेच्छापत्रे, दिवे व पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले.कार्यनुभव व चित्रकला विषयांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, कल्पकता, कृतीशीलता आणि संघभावना विकसित व्हावी, तसेच विविध कौशल्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ‘टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे’ हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी रंगीत कागद, पुठ्ठा, कापूस, दोरा, डिंक, रंगसाहित्य व माती यांसारख्या साहित्याचा वापर करून दीपावलीचा संदेश देणारी सुंदर शुभेच्छापत्रे, दिवे तसेच विविध आकारांचे आकर्षक आकाशकंदील तयार केले. विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या या वस्तू शाळेतील पदाधिकारी व शिक्षकांना भेट दिल्या.या उपक्रमासाठी चित्रकला व कार्यानुभव विषयाच्या शिक्षिका सौ. नीलिमा सपकाळे व सौ. रुपाली महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे व उपमुख्याध्यापक संजय वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना दीपावली सणाचे महत्त्व सांगितले. तसेच प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याचे आवाहन करून विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय वानखेडे, पर्यवेक्षक सौ. रमा तारे, जगदीश साळुंखे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

