Thursday, November 5, 2026
police dakshta logo
Homeक्राईमएमआयडीसी पोलिसांकडून दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड; चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

एमआयडीसी पोलिसांकडून दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड; चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत चोरीस गेलेल्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी एका ३४ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून, दुसऱ्या गुन्ह्यात एका अल्पवयीन बालकाचा सहभाग निष्पन्न झाला आहे.जळगाव शहरातील शनिपेठ भागात राहणारे तरबेज सैय्यद आसिफ यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. एमएच १९ टी ७७७०) ही दुचाकी अजिंठा चौफुलीजवळील इदगाह कॉम्प्लेक्स येथील रिलायबल लॉजिंगच्या खाली पार्क केली होती. वैयक्तिक काम आटोपून परत आल्यानंतर त्यांना दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या