केमिस्ट्री, फिजिक्स, गणित, इंग्रजीसह विविध विषयांच्या शिक्षकांसाठी पदे उपलब्ध; इच्छुक उमेदवारांना शाळेकडून आवाहन
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव तालुक्यातील तरसोद येथील चावरा इंटरनॅशनल स्कूल (ICSE) येथे विविध शैक्षणिक पदांसह महिला कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी वॉक-इन इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आले आहेत. शाळेच्या वतीने यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेत रसायनशास्त्र (केमिस्ट्री), भौतिकशास्त्र (फिजिक्स), गणित (मॅथ्स), इंग्रजी, जीवशास्त्र (बायोलॉजी), सामाजिक शास्त्र (एसएसटी), संगणक (कॉम्प्युटर) आणि चित्रकला (ड्रॉइंग) या विषयांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय महिला कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठीही जागा उपलब्ध आहेत.संबंधित विषयातील शैक्षणिक पात्रता, विषयाचे सखोल ज्ञान आणि अध्यापन कौशल्य असलेल्या उमेदवारांना या भरतीत प्राधान्याने संधी मिळू शकते. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.इच्छुक उमेदवारांनी चावरा इंटरनॅशनल स्कूल, प्लॉट क्रमांक ३२५/३२८, तरसोद फाटा परिसर, स्वामिनारायण मंदिराजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ९३५६९९७४४७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.

