Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावभालचंद्र पाटील यांची अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव यांच्या ‘नियामक मंडळ सदस्यपदी’ नियुक्ती

भालचंद्र पाटील यांची अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव यांच्या ‘नियामक मंडळ सदस्यपदी’ नियुक्ती

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह….

जळगाव/ कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचेकडील जी.आर. नुसार, जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन व्यवस्थापन मंडळ व संचालक श्री.भालचंद्र पाटील यांची शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव यांच्या ‘नियामक मंडळ (Board of Governance)’ सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्वायत्त संस्थांचे कामकाज सुव्यवस्थित रितीने चालण्याकरीता सदर नियामक मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.

श्री.पाटील हे उच्च विद्याविभूषित असून टेक्नॉलॉजी यासह विविध नामांकित संस्थेत एक तज्ञ म्हणून सक्षमपणे कार्य केले असून ही निवड म्हणजे त्याचीच पावती आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांचे शिक्षण, उद्योग,सहकारी सह सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या