Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमचोरट्यांची अजबच शक्कल..! भिंतीखाली खड्डा खोदून चोरी केल्याचे उघड, गुन्हा दाखल

चोरट्यांची अजबच शक्कल..! भिंतीखाली खड्डा खोदून चोरी केल्याचे उघड, गुन्हा दाखल

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- चोरी करण्याचे तंत्र ही बदलत चालले असून चक्क भिंतीखाली खड्डा खोदून,क्लुप्ती लढवून चोरी केल्याची घटना जळगावात घडली आहे. एमआयडीसीतील एच. डी. प्रोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून चोरट्यांनी चोरी केल्याचे उघड झाले आहे. दीड लाख रूपयांचे साहित्य चोरून नेण्यात आले आहे. या प्रकरणी गुरूवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एच.डी. प्रोटेक्ट कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून मोहन कुलकर्णी हे कार्यरत आहेत. बुधवारी सकाळच्या सुमारास कंपनीत गेले असता त्यांना फाँड्री विभागातील व्यवस्थापक ए. कुमारेशन यांनी सांगितले की, १ लाख ३२ हजार तीनशे रूपये किंमतीचे मिडल एल्बो कास्टींग आणि १३ हजार रूपये किंमतीचे एनगॉट ब्राँझ धातूच्या दोन पट्टया गायब झाल्या आहेत. त्यानंतर कुलकर्णी यांच्यासह इतर सहका-यांनी कंपनीच्या आवारामध्ये गायब झालेल्या साहित्यांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाही.पुन्हा त्यांनी बारकाईने शोध घेतला. त्यावेळी त्यांना कंपनीच्या पूर्व बाजूच्या संरक्षक भिंतीच्या खाली मोठा खड्डा खोदलेला दिसला. या खड्ड्यातून प्रवेश करीत चोरट्यांनी कंपनीतून साहित्य चोरी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या