Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावगुन्हे वाढले; भुसावळ विभागात गस्त घालण्यासाठी ७ ई-बाईकचे वितरण

गुन्हे वाढले; भुसावळ विभागात गस्त घालण्यासाठी ७ ई-बाईकचे वितरण

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्रातील जळगाव येथील भुसावळ तालुक्यात प्रथमच उपविभागातील पोलीस स्टेशनला आमदार स्थानिक विकास कार्यक्रम (सन २००२२-२३) अंतर्गत सात ई – बाईक वितरण आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.नशिराबाद पोलीस ठाण्यासाठी एक बाईक मिळाली आहे.

उपविभागात बाजारपेठ पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, नशिराबाद पोलीस स्टेशन असे चार पोलीस स्टेशनचा समावेश आहे. चारही पोलीस स्टेशनची हद्द मोठी असल्याने रात्रीची गस्त करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडे पुरेसे वाहने नसल्याने बऱ्याच भागांमध्ये चोरी, दरोडे, घरफोडी, खून असे गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. हा प्रकार कुठेतरी थांबावा यासाठी बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी ही संकल्पना डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे मांडली आणि त्यांनी तत्काळ पोलीस अधिक्षक एम. राजकुमार जळगांव यांच्याकडे वर्ग केली. पोलीस विभागाला तालुक्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम ( सन २००२२-२३) अंतर्गत सात ई – बाईक दिलेल्या आहे. पोलिसांना सुविधा मिळावी. तपास यंत्रणा लवकर कार्यत्वीत व्हावी. पेट्रोलचा येणार खर्च कमी व्हावा. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यादृष्टीने सुरुवात करण्यात आली आहे. याचा निकाल मिळाल्यानंतर महाराष्ट्राने याचे अनुकरण केल्यास महाराष्ट्रातील पोलीसांचा जो पेट्रोलचा खर्च आहे तो नक्कीच कमी होईल.
भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे हे गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील पोलीस स्टेशनला ई-बाईक वितरणासाठी कसोशीने प्रयत्न करीत होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. शनिवार (ता. ६) सात ई – बाईक वितरण करण्यात आल्या. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम (सन २००२२-२३) अंतर्गत भुसावळ येथील उपविभागातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसें–दिवस वाढतांना दिसत आहे. भरदिवसाही घरफोड्या होत आहेत. चोरीचे प्रमाण खूपच वाढलेले दिसून येत आहे. या सर्व गोष्टींना अंकुश लावण्यासाठी तसेच रात्रीची गस्त वाढवण्यास ई- बाईक ही महत्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ,उपनिरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या