Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यामहिलेच्या प्रसूती दरम्यान अतिरक्तस्त्रावाने मृत्यू

महिलेच्या प्रसूती दरम्यान अतिरक्तस्त्रावाने मृत्यू

अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- गोंडस मुलाला जन्म दिल्याचा आनंद असतानाच अतिरक्तस्त्रावाने २२ वर्षीय विवाहितेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या महिलेचे तालुक्यातील लोण तांडा येथील माहेर होते. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लोणतांडा येथील गायत्री हीचा विवाह एरंडोल तालुक्यातील खडके येथील दिनेश पवार यांच्याशी गेल्या वर्षीच झाला होता. प्रसूती जवळ आल्याने गायत्री ही माहेरी लोण तांडा येथे आली होती. दिनांक २५ रोजी अचानक प्रसूती कळा जाणवू लागल्याने तिला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिने मुलास जन्म दिला. मात्र अतिरक्तस्त्राव होत असल्याने तिला धुळे येथे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून सांगितले. याप्रकरणी पती दिनेश पवार यांच्या फिर्यादीवरून धुळे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येवून मारवड पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रेखा भरत इशी ह्या करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या