Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमभुसावळच्या एमआयडीसी भागात एकावर चाकू हल्ला

भुसावळच्या एमआयडीसी भागात एकावर चाकू हल्ला

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या घटनेत वाढ झाली आहे.भुसावळ तालुक्यातील खडका ग्रामपंचायतीच्या सरपंच यशोधरा देविदास तायडे यांचे पुत्र गिरीष तायडे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास एम.आय.डी. सी.परिसरात चाकूने सहा वार केल्याने त्यास रक्ताने माखलेल्या अवस्थेत भुसावळ शहरातील रिदम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.सदरील घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड तसेच कर्मचारी दाखल झाले .सदरील घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे झाले होते.त्यांनी पाहणी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या