सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूर हैदराबाद महामार्गावरील दक्षिण तालुक्यातील ईटकळ ते पिंजरवाडीकडे जाणाऱ्या चाकी वाहन क्रमांक डब्ल्यू बी 94 ईएन-0552 हे वाहन येत असताना पिंजरवाडीच्या अलीकडे दोन किलोमीटर अंतरावर एक ट्रक त्याचा क्रमांक एम एच १३ टीव्ही 88 95 या वाहनाने चार चाकी वाहनाला कट मारल्याने गाडी पलटी होऊन बंदेनवाज मेहता (वय वर्ष 45) राहणार पिंजरवाडी तालुका दक्षिण सोलापूर यांना डोक्यात व छातीत मार लागल्याने ते बेशुद्ध झाले व एक जण गंभीर जखमी झाला.हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे पिंजारवाडीचे उपसरपंच गणेश शेख यांनी दाखल केले असता ते उपचारापूर्वी मयत झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.जखमीवर उपचार सुरु आहेत.हा अपघात इतका भीषण होता की, चारचाकी वाहन अक्षरशः चक्काचूर झालेला आहे.या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

पिंजारवाडी येथे ट्रक आणि कारच्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी
RELATED ARTICLES

