जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथे ग्रीन जळगाव सिटी मार्फत स्टेडियम कॉम्प्लेक्स रिंग रोड येथे 38 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली .याप्रसंगी गौतम वडनेरे , डॉक्टर अर्जुन भंगाळे, सुमित्रा पाटील, संगीता पाटील, डॉ. प्रकाश चित्ते, रतन थोरात, डॉक्टर सुनील नाहटा जिल्हा बँकेचे विनोद पाटील संतोष चेलानी ,हेमंत म्हाळस , मुकुंद एडके, राजू दोशी ,अशोक धूत ,लक्ष्मीकांत वाणी, सुनील भिरूड, वसंत पाटील, देविदास ढेकळे, राजू वाणी, विवेक वाणी, अभय खांदे, संतोष क्षीरसागर, आणि डॉक्टर कंचन वाणी उपस्थित होते. लोकसहभागातून हा उपक्रम ग्रीन जळगाव सिटी मार्फत राबवला गेला.या उपक्रमास मान्यवरांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले संपूर्ण जळगाव शहरात सप्टेंबर अखेरपर्यंत 2500 रोपांची लागवड ग्रीन जळगाव सिटी करेल आणि जळगाव शहराला हिरवेगार व 35 डिग्री पर्यंत तापमान आणण्याचा प्रयत्न असेल असे संस्थेचे अध्यक्ष विजय वाणी यांनी सांगितले.