Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजीवननगरमध्ये चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगलपोत लांबवली

जीवननगरमध्ये चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगलपोत लांबवली

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथील जीवन नगरमध्ये आशा ज्ञानेश्वर महाले (५५) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास या कॉलनीतीलच इतर महिलांसोबत घरासमोर भाजीपाला खरेदी करीत होत्या. इतर महिला दुसऱ्या बाजूला होत्या, तर महाले या रस्त्याच्या बाजूने होत्या. त्यांना दोन जण दुचाकीवर येताना दिसले, त्यामुळे त्या बाजूला व्हायला लागल्या, त्याच वेळी दुचाकीस्वाराने त्यांना खाली लोटले आणि त्यांच्या गळातील ८५ हजार रुपये किमतीची १७ ग्रॅम वजनाची सोनपोत ओढून घेतली.त्यात ही महिला खाली कोसळली व माझी पोत चोरली असे सांगू लागल्या. त्या वेळी इतर महिला व भाजीपाला विक्रेता मदतीसाठी तसेच चोरट्यांचा पाठलाग करण्यासाठी धावले. मात्र तोपर्यंत दुचाकीस्वार पसार झाले होते. या प्रकरणी आशा महाले यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ,त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी श्री.बोरुडे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या