Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावडोणगाव शिवारात तीन एकर हरभरा आगीत खाक

डोणगाव शिवारात तीन एकर हरभरा आगीत खाक

चिंचोली ता यावल – ब-हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली किनगाव दरम्यान असलेल्या डोणगाव शेत शिवारातील गट नंबर २३८ मधील इब्राहिम बिस्मिल्ला कुरेशी यांच्या शेतातील हरभरा आगीत भस्मसात झाल्याची घटना दि १४ रोजी संध्याकाळी साडेसात ते साडे आठ वाजेच्या दरम्यान घडली. यामुळे कुरेशी यांच्या तीन एकर शेतातील हरभरा जळून खाक झाल्याने जवळपास १ लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की किनगाव तालुका यावल येथील रहिवासी असलेले इब्राहिम बिस्मिल्ला कुरेशी यांचे चिंचोली जवळील डोणगाव शिवारात असलेले गट नंबर २३८ मधील शेतात हरभरा गेल्या दोन दिवसापासून आभ्राच्छदित वातावरण असल्याने कापुन व जमा करून तारपट्टी खाली झाकून ठेवलेला होता. परंतु दि. १४ रोजी संध्याकाळी साडेसात ते साडे आठ वाजेच्या सुमारास इब्राहिम कुरेशी यांना सदर घटना समजताच त्यांनी यावल पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. इब्राहिम कुरेशी यांचा मुलगा अबराल कुरेशी याने आपल्या मोबाईल वरुन यावल पोलीस स्टेशनला फोन केला. व लागलीच यावल पोलीसांनी यावल नगर परिषद मध्ये फोन करून अग्निशमन बंब गाडी ही पाठविण्यात आली. आगीची घटना संध्याकाळी साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान घडल्याने यावल येथून अग्निशमन दलाचे बंब येईपर्यंत बराच हरभरा जळुन खाक झाल्याने जवळपास १लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार कुरेशी यांनी यावल पोलीस स्टेशनला दिली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या