ग्रामस्थांकडून सरपंच किरण नन्नवरे यांनी केलेल्या विविध विकास कामांचे कौतुक..
जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- एरंडोल तालुक्यातील कढोली येथील सरपंच किरण नन्नवरे यांचा वाढदिवस पी.जी. कुमावत प्रतिष्ठान नशिराबाद संचलित माऊली इंग्लिश मिडीयम स्कूल कढोली ता.एरंडोल व काढोली येथील ग्रामस्थ यांनी माऊली इंग्लिश मिडीयम स्कूल कढोली येथील स्कूलच्या प्रारंगणात साजरा केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथमतः सरपंच किरण नन्नवरे यांच्या हस्ते स्कूलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी तेथील ग्रामस्थांतर्फे सरपंच किरण नन्नवरे यांनी गावात कमी कालावधीत जास्तीत जास्त विकास कामे केल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमा वेळी पी.जी.कुमावत प्रतिष्ठान नशिराबाद संस्थेचे सचिव प्रताप कुमावत, वैजनाथ ग्रामपंचायत सरपंच देविदास पाटील, पोलीस दक्षताचे संपादक चंदन पाटील, संपादक अनिल रणधीर व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणत उपस्थिती होती.