चांदवड/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- चांदवड येथील श्री.गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात पैठण येथील वेदशास्त्र संपन्न पुराणाचार्य डॉ.श्री प्रसाद महाराज भागवत
यांच्या प्रासादिक वाणीतून शनिवार दिनांक २१ डिसेंबर ते शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर पर्यंत दररोज दुपारी २ ते सायंकाळी ५ या कालावधीत श्रीमद् भागवत कथा संपन्न झाल्याची माहिती मंदिराचे पुजारी श्री अमोल दीक्षित यांनी दिली.
धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात सूर्यकिरणे तिरपी पडतात ज्यामुळे थंडी पडायला सुरुवात होते वातावरण प्रसन्न असते आयुर्वेदिक शास्त्रानुसार या महिन्याला स्वास्थवर्धक मास असे म्हटले जाते म्हणूनच भगवंताने मासानां मार्गशीर्षोऽहम्..असे भगवद्गीतेत म्हटले आहे या भगवद् वचनानुसार मार्गशीर्ष महिना हा भगवंताचेच स्वरूप आहे याचेच औचित्य साधून चांदवड येथील श्री.गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्ण मंदिरात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
भागवत सप्ताह काळात नारद चरित्र पासून ते गोकर्ण आख्यानापर्यंत विविध विषयांवर निरूपण विस्तृतपणे संपन्न झाले संत परिसा भागवत यांचे वंशज श्री प्रसाद महाराज भागवत यांचे संस्कृत व मराठी भाषेवरील प्रभुत्व,सुंदर भाषा शैली,उत्तम सादरीकरण यामुळे त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली मूळचे प्रतिष्ठान असलेल्या पैठण या क्षेत्री वयाच्या चौदाव्या वर्षी श्री प्रसाद महाराज यांनी पहिले भागवत केले. कांचिकामकोटी पीठाधीश्वर आद्य शंकराचार्य यांनी पुराणाचार्य ही पदवी देऊन सन्मानित केले आहे.
सप्ताह काळात श्री प्रसाद महाराज भागवत यांना श्री हरसिंग परदेशी ,जयपाल परदेशी, श्री चव्हाण सर ,सुहास निकुंभ,प्रतिक नेवगे, बबलू गवळी आदींची श्रम घेतले. भागवताचे यजमानपद नासिक येथील एसबीआयचे श्री दीपक काळे यांनी भूषविले .यावेळी श्री दिपक काळे , दीक्षित परिवार व चांद्वाडकरांच्या वतीने श्री अशोक काका व्यवहारे यांनी महाराजांचा यथोचित सत्कार केला सप्ताहकाळात अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास हजेरी लावली व महाआरतीचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीक्षित परिवाराने विशेष परिश्रम घेतले यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

