मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मतदारसंघातील रावेर तालुक्यात “जिल्हा परिषद आपल्या दारी” या अभिनव उपक्रमांतर्गत तक्रार निवारण सभा उत्साहात संपन्न झाली. ‘जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल’ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली. याप्रसंगी माझ्यासह रावेर विधानसभा आमदार अमोल जावळे,अधिकारी वर्ग,प्रशासकीय कर्मचारी तसेच शिवसेना-युवासेना,भाजपा, राष्ट्रवादी, महायुती पदाधिकारी व असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, कृषी, बांधकाम, घरकुल आदी विविध विभागांशी संबंधित तक्रारी थेट जनतेकडून ऐकण्यात आल्या.अनेक तक्रारींवर तत्काळ निर्णय घेण्यात आले तर उर्वरित बाबींवर त्वरित कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. या उपक्रमामुळे प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचत आहे, त्यांच्या अडचणी जाणून घेत आहे आणि लोकशाही अधिक सशक्त बनवत आहे.

