Wednesday, May 6, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याबलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल बंदीची शक्यता; कायद्यात बदलासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल बंदीची शक्यता; कायद्यात बदलासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडण्यास बंदी घालण्याची तरतूद प्रचलित कायद्यात करण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना यासंदर्भात आवश्यक कायदेशीर तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेले आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून अशा गुन्ह्यांतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देण्यात येऊ नये, अशी स्पष्ट तरतूद कायद्यात असणे आवश्यक असल्याचे मत मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.या प्रस्तावामुळे समाजात सकारात्मक संदेश जाऊन न्यायव्यवस्थेबाबत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारकडून कडक धोरणात्मक पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या