Wednesday, May 6, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगावात राज्यस्तरीय सिक्स ए साईड इंडोअर हॉकी स्पर्धेचा समारोप; बक्षीस वितरण उत्साहात

जळगावात राज्यस्तरीय सिक्स ए साईड इंडोअर हॉकी स्पर्धेचा समारोप; बक्षीस वितरण उत्साहात

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथे महाराष्ट्र सिक्स ए साईड इंडोअर हॉकी संघटना व जळगाव जिल्हा सिक्स ए साईड इंडोअर हॉकी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सिक्स ए साईड इंडोअर हॉकी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. ही स्पर्धा दिनांक १ मे ते ३ मे २०२६ दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल तसेच रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत राज्यभरातून मुलगे व मुली मिळून सुमारे ३०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

समारोप प्रसंगी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते जनरल विजेतेपदाचे वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूलचे ऑब्जर्व्हर संतोष प्रधान, महाराष्ट्र सिक्स ए साईड इंडोअर हॉकी संघटनेचे सचिव अश्पाक शेख, विकास शेडके, जिल्हा सचिव डॉ. आसिफ खान तसेच जळगाव जिल्हा हौशी ज्यूदो असोसिएशनचे सचिव व क्रीडा संचालक डॉ. उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशिपमध्ये पुरुष गटात जळगाव मनपा संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर जळगाव जिल्हा संघ उपविजेता ठरला. नाशिक संघाने तृतीय स्थान मिळविले. महिला गटात नागपूर संघाने प्रथम, यवतमाळ संघाने द्वितीय तर चंद्रपूर संघाने तृतीय क्रमांक मिळविला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आसीफ खान, डॉ. उमेश पाटील, याकूब शेख, अकबर खान, आरिफ शेख, अख्तर खान, शेख शाहिद, झहीर खान, वासिम अहमद, शेख जावेद, योगेश महाजन, डॉ. चांद खान, महेश पाटील, अतुल गोरडे, अजय काशीद, डिगंबर महाजन, सचिन वाघ, प्रा. सुभाष वानखेडे, अशफाक शेख, देवेंद्र सूर्यवंशी, मयूर पाटील, दिनेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसीफ खान यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. उमेश पाटील यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या