Wednesday, June 24, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याभुसावळ - वराडसिम - बेलव्हाळ एसटी सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

भुसावळ – वराडसिम – बेलव्हाळ एसटी सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ येथून ग्रामीण भागाकडे धावणारी एसटी बस सेवा विद्यार्थ्यांना सुट्टी लागताच अचानक बंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः आबालवृद्ध, अपंग व महिलांचे हाल होत असून तत्काळ सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (सुनेत्रा पवार गट) पदाधिकाऱ्यांनी केली आहे.याबाबत भुसावळ तालुका अध्यक्ष विलास रामदास पाटील, युवा तालुका अध्यक्ष अतुल चव्हाण, गोजोरा येथील सरपंच पती व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी, उपसरपंच चंद्रकांत पाटील, विकासो सदस्य विजय सिंग पाटील, रामदास झाडखंडे आदी पदाधिकाऱ्यांनी भुसावळ बस स्थानक व्यवस्थापक राकेश शिवदे यांना निवेदन सादर केले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शाळांना सुट्टी लागल्याने व प्रवाशांची संख्या कमी असल्याचे कारण देत एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, काही वाहनधारकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना शासनाच्या सवलतींचा लाभ मिळत नाही, तर महिलादेखील सुरक्षित व स्वस्त प्रवासापासून वंचित राहत आहेत.या पार्श्वभूमीवर बेलव्हाळ, सुनसगाव, गोजोरा, वराडसिम आदी मार्गांवरील एसटी बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी ठाम मागणी विलास पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या