Wednesday, June 24, 2026
police dakshta logo
Homeजळगावभजन संध्या कार्यक्रमात भाविक झाले तल्लीन..!

भजन संध्या कार्यक्रमात भाविक झाले तल्लीन..!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव नगरीतील श्रीकृष्ण कॉलनी व परिसरातील शिवभक्त, भाविक आणि संगीतप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आजचा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला..!आज सोमवार, दिनांक २२ जून रोजी संध्याकाळी बजरंग बोगद्याजवळील श्रीकृष्ण कॉलनी येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आलेली “भजन संध्या” प्रचंड भक्तीमय वातावरणात पार पडली. भक्ती आणि संगीताचा हा अपूर्व संगम प्रत्येक भाविकाला मंत्रमुग्ध करून गेला. प्रसिद्ध ‘भक्तीनाद भजन संध्या ग्रुप’ ने आपल्या सुश्राव्य सादरीकरणाने सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसर विठ्ठल-चरणी आणि शिव-चरणी लीन केला.प्रमुख गायक निलेश पाटील आणि गुणी गायिका वृंदा पालखे यांच्या सुमधुर आवाजाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. भाविक सुरांच्या तालावर मंत्रमुग्ध झाले.

आपल्या अमोघ वाणीने कार्यक्रमात रंगत आणत कलावंत तुषार वाघुळदे यांनी विशेष निवेदन केले. तसेच सहकारी प्रवीण आबा पाटील यांची मोलाची साथ लाभली. श्रीकृष्ण कॉलनी परिसर आणि जळगाव शहरातील असंख्य भाविक भक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली.हा भक्तीमय स्वर सोहळा यशस्वी केल्याबद्दल उपस्थित सर्व भाविक, संगीतप्रेमी आणि ग्रामस्थांचे सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र मंदिर संघाचे हितेंद्र धांडे व जयेश कुळकर्णी यांनी मनःपूर्वक आभार मानले.त्यांनी तसेच सौ.ज्योत्स्ना धांडे, सौ.उन्नती कुळकर्णी, सरला येवले यांनी कलाकारांचा सत्कार केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या