जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील बालशिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या चावरा वंडरकिड्स संस्थेने विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर दोन नव्या शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, या शाखांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य फादर जोबी यांनी दिली.संस्थेची पहिली नवीन शाखा जुना खेडी रोड परिसरातील विठोबा नगर येथे गीताई बिल्डिंगजवळील प्लॉट क्रमांक ०६ वर सुरू करण्यात आली आहे. तर दुसरी शाखा खोटे नगर परिसरातील वातिका आश्रमाजवळ प्लॉट क्रमांक १९ येथे कार्यान्वित करण्यात येत आहे.

नर्सरी, ज्युनिअर के.जी. आणि सिनिअर के.जी.च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या दोन्ही शाखांमधील नियमित वर्गांना १ जुलै २०२६ पासून प्रारंभ होणार असल्याचे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा विस्तार करण्यात आल्याचेही संस्थेकडून सांगण्यात आले. आतापर्यंत पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल संस्थेने आभार व्यक्त केले असून, नव्या शाखांनाही नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच ही माहिती मित्रपरिवार, नातेवाईक व परिचितांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश व अन्य माहितीसाठी इच्छुक पालकांनी शाळेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य फादर जोबी यांनी केले आहे.


