रावेर (चिनावल) | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक गणेश बाविस्कर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत मोलाचे मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अनिल सुधाकर किरंगे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर शिक्षिका सपना ढाके यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन खेमचंद्र गोवर्धन पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र वामन पालक, संचालक विनायक दामोदर महाजन, संचालक दामोदर यादव महाजन यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गारसे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी कविता नेमाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.समारंभ आनंददायी वातावरणात पार पडत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

