बसस्थानक परिसरात सापळा रचत धाडसी कारवाई!
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- बसस्थानक परिसरात गावठी कट्टा बाळगून दहशत माजवणाऱ्या सराईत आरोपीस नशिराबाद पोलिसांनी धाडसी कारवाई करत अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 19 एप्रिल 2026) सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली.सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कमलाकर प्रभाकर महाजन (वय 36, रा. वरची अळी, नशिराबाद) हा इसम बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नारखेडे यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले.पोलीस पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी, चंदेरी रंगाचा व काळ्या प्लास्टिक मुठीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी (भुसावळ विभाग) केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

