Thursday, April 23, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याप्रा.रफिक शेख यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा; जनमत प्रतिष्ठानचा उपक्रम

प्रा.रफिक शेख यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा; जनमत प्रतिष्ठानचा उपक्रम

बेघर निवारा केंद्र, रिमांड होम व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्न व फळांचे वाटप

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जनमत प्रतिष्ठानच्या वतीने जी.एस. रायसोनी कॉलेजचे प्राध्यापक रफिक शेख यांचा वाढदिवस दि. 20 एप्रिल रोजी अत्यंत साध्या व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी बेघर निवारा केंद्र, रिमांड होम तसेच जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.रिमांड होममधील मुलांना फळांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. तसेच बेघर निवारा केंद्रामध्ये आपल्या कुटुंबीयांनी सोडून दिलेल्या ४२ वृद्धांसाठी प्रा. रफिक शेख यांच्या हस्ते भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमातून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधोरेखित करण्यात आली.यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्येही गरीब व गरजू लहान मुलांना फळांचे वाटप करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, सचिव हर्षली पाटील, प्रा. रफिक शेख, कुलकर्णी सर, हर्षल वंजारी सर, पवार सर यांच्यासह रिमांड होममधील कर्मचारी व इतर सहकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या