फैजपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- माजी नगराध्यक्ष निलेश भाऊ राणे यांच्या सन 2027 या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सतपंथ मंदिर संस्थानात महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज व ह.भ.प भरत महाराज म्हैसवाडीकर,फैजपूर नगरीचे नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्या हस्ते शुक्रवार दिवशी सकाळी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती करण्यात आले. गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने दरवर्षी कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात येऊन घरोघरी वाटप करण्यात येतात.
यावेळी माजी नगराध्यक्ष (पिंटू ) निलेश राणे, नगरसेवक पवन सराफ,नगरसेवक सागर होले,नगरसेवक राहुल गुजराथी, नगरसेवक सूरज गाजरे,सामाजिक कार्यकर्ता अनंता नेहेते,मा. उपनगराध्यक्ष राकेश जैन, ,किरण चौधरी,वैभव वकारे, मनोज होले, अक्षय परदेशी, पराग पाटील,विनोद बोरोले, मनोज चौधरी,गोलू चौधरी,विनोद परदेशी,अमोल वकारे, राकेश सराफ,भावेश नाथजोगी, दिपक सराफ,शुभम धनगर ,हिमांशू राणे,गौरव राणे, लोकेश राणे अजय कुमावत,गोलू पाटील ,आदींची उपस्थिती होती.

