Sunday, June 7, 2026
police dakshta logo
Homeजळगावना. गिरीष महाजन यांचे कट्टर समर्थक शिंदे गटात दाखल..! भाजपातील खदखद वाढली...

ना. गिरीष महाजन यांचे कट्टर समर्थक शिंदे गटात दाखल..! भाजपातील खदखद वाढली…

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भाजपचे संकट मोचक म्हटले जाणारे मंत्री गिरीष महाजन यांचे कट्टर समर्थक शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. जळगावातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. भाजप मध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची भावना शिदे गटात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या या प्रवेशामुळे जळगावमधील राजकीय वातावरण तापले आहे.

विशेष म्हणजे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे काही कार्यकर्तेही शिंदे गटात सहभागी झाल्याने या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये भूषण भोळे, राहुल पाटील, प्रशांत कोळी, विशाल महाजन, महेश पाटील, मुकेश पाटील, गणेश बच्छाव, प्रशांत चौधरी, राजीक पटेल, ओम बारी, रंजन पाटील, चेतन चौधरी, अक्षय भडांगे, सुयोग गुजर, विकास ठाकरे, जयेश पाटील, सागर पाटील, लोकेश पाटील, भावेश पाटील, दीपक कोळी आणि तौफिक खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे जळगावमधील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.भाजप मध्ये सध्या मोठ्याप्रमाणात गट तटाचे राजकारण सुरु झाले आहे. या राजकारणाचा अनेकांना फटका बसला आहे. नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून काही उपऱ्या बाहेरच्या लोकांना तिकीट देण्यात आले. भाजपमध्ये अनेक वर्षांपासून काम करणाऱ्यांना संधी देणे अपेक्षित असतांना बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी देवून त्यांना निवडून आणले. त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी वाढली आहे.

तसेच भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात “घराणेशाही” सुरु झाल्यामुळे देखील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खदखद व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे भाजपमध्ये खासदार रक्षा खडसे, ना. महाजन, आ.मंगेश चव्हाण, आ. राजूमामा भोळे, खासदार स्मिता वाघ यांचे वेगवेगळे गट तयार झाले आहेत. त्या गटतटाच्या राजकारणाचा फटका देखील भविष्यात भाजपाला बसेल, असे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या